• الثلاثاء. ديسمبر 3rd, 2024

Moto E22s स्मार्टफोन MediaTek Helio G37 प्रोसेसरसह भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

स्वस्त मस्त असलेल्या मोटोरोला कंपनीच्या स्मार्टफोनची कायमच मोबाईलप्रेमींमध्ये उत्सुकता असते. कंपनीने आता नवा कोरा Moto E22s स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. हँडसेट IP52 वॉटर-रेपेलेंट डिझाइनसह आहे. या स्मार्टफोनचा डिस्प्ले 6.5 इंच असून 16 मेगापिक्सल AI कॅमेरा, अँड्रॉईड 12 यासारखे फीचर्स दिले आहेत.

Moto E22s Smartphone Launch In India: स्वस्त मस्त असलेल्या मोटोरोला कंपनीच्या स्मार्टफोनची कायमच मोबाईलप्रेमींमध्ये उत्सुकता असते. कंपनीने आता नवा कोरा Moto E22s स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. हँडसेट IP52 वॉटर-रेपेलेंट डिझाइनसह आहे. या स्मार्टफोनचा डिस्प्ले 6.5 इंच असून 16 मेगापिक्सल AI कॅमेरा, अँड्रॉईड 12 यासारखे फीचर्स दिले आहेत. स्क्रिन आस्पेक्ट रेशिओ 20:9 असून रिफ्रेश रेट 90 हर्ट्ज आहे. त्यामुळे फोनमध्ये अॅप्स आणि वेबसाईट स्क्रॉल करणं सोपं होतं. फोनमध्ये 64 GB स्टोरेज उपलब्ध आहे जे मायक्रोएसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येते. Moto E22S मध्ये 4 GB RAM चा पर्याय उपलब्ध आहे. कनेक्टिव्हिटीसाठी स्मार्टफोनमध्ये 4G, ब्लूटूथ, वाय-फाय, GPS सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

मोटोरोलोचा Moto E22s स्मार्टफोन अँड्राईड 12 ऑपरेटिंग सिस्टमसह येतो. स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये HyperEngine तंत्रज्ञानासह 2.3 GHz ऑक्टा-कोर MediaTek Helio G37 प्रोसेसर आहे. हँडसेट डायमेन्शन 163.95 x 74.94 x 8.49 मिलीमीटर आणि वजन 185 ग्रॅम आहे.

Moto E22S भारतात 8,999 रुपयांना उपलब्ध करण्यात आला आहे. हा फोन इको ब्लॅक आणि आर्क्टिक ब्लू कलर व्हेरियंटमध्ये येतो. मोटोरोलाच्या बजेट हँडसेटची विक्री 22 ऑक्टोबरपासून दुपारी 12 वाजता सुरू होईल. हा फोन ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्ट आणि स्टोअरमधून खरेदी केला जाऊ शकतो. रिलायन्स जिओसह या स्मार्टफोन 2549 रुपयांचा लाभ मिळेल. रिचार्जवर रु. 2,000 कॅशबॅक आणि वार्षिक Zee5 सदस्यत्वावर रु. 549 सूट मिळेल. फ्लिपकार्ट Axis Bank कार्ड वापरून फोन खरेदीवर 5% कॅशबॅक देखील घेता येईल.