• السبت. نوفمبر 23rd, 2024

किशोर कुमार यांच्या बायोपिकमध्ये दिसणार रणबीर कपूर: म्हणाला- 11 वर्षांपासून यावर काम करतोय, अनुराग बसू लिहित आहेत स्क्रिप्ट

Byगौरव नाटेकर

فبراير 27, 2023

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर लवकरच दिवंगत अभिनेते-गायक किशोर कुमार यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. अलीकडेच रणबीरने त्याचा आगामी चित्रपट ‘तू झुठी में मक्कार’ या चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये या बातमीला दुजोरा दिला आहे.

अनुराग बसू लिहित आहेत या चित्रपटाची स्क्रिप्ट
यादरम्यान रणबीर म्हणाला, ‘मी किशोर कुमार यांच्या बायोपिकचा एक भाग असून आम्ही गेल्या 11 वर्षांपासून त्यावर काम करत आहोत. अनुराग बसू त्याची कथा लिहित आहेत.’ यासोबतच रणबीरने सांगितले की, हा माझा पुढचा बायोपिक असेल.

गेल्या वर्षी किशोर दा यांच्या मुलानेही दिली होती बायोपिकची माहिती
गेल्या वर्षी, ETimes ला दिलेल्या मुलाखतीत, किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार यांनी त्यांच्या वडिलांची बायोपिक येणार असल्याचे सांगितले होते. बायोपिकबद्दल बोलताना अमित कुमार म्हणाले होते, “आम्ही माझ्या वडिलांवर बायोपिक बनवत आहोत.” अनुराग बसू आणि रणबीर हे एकत्र येणार आहेता का? असे विचारले असता ते म्हणाले होते, ‘नाही, आम्ही स्वत: त्याची निर्मिती करू. आम्ही पटकथेवर काम सुरु केले आहे.’ पण आता रणबीरच्या खुलाशानंतर चाहते संभ्रमात पडले आहेत. अमित यांनी बायोपिकबद्दल चुकीची माहिती का दिली, असा प्रश्न लोकांनी विचारला आहे.

किशोर कुमार यांनी अनेक भाषांमध्ये गायली गाणी
किशोर कुमार आता या जगात नाही, पण त्यांच्या आवाजाची जादू कायम आहे. त्यांची गाणी संगीतप्रेमींची पहिली पसंती आहेत. किशोर दांनी हिंदी, बंगाली, आसामी, गुजराती, भोजपुरी, कन्नड, मल्याळम आणि उर्दूमध्ये गाणी गायली. किशोर यांचा जन्म 4 ऑगस्ट 1929 रोजी मध्य प्रदेशातील खंडवा येथे झाला होता. त्यांचे बालपणीचे नाव आभास कुमार गांगुली होते, पण नंतर त्यांनी त्यांचे नाव बदलून किशोर कुमार ठेवले.

किशोर कुमार यांनी केले होते चार वेळा लग्न
किशोर कुमार यांनी चार लग्न केले होते. त्यांच्या पहिल्या पत्नीचे रुमा गुहा, दुसऱ्या पत्नीचे नाव मधुबाला, तिसऱ्या पत्नीचे नाव योगिता बाली आणि चौथ्या पत्नीचे नाव लीना चंदावरकर आहे. 36 वर्षांपूर्वी (13 ऑक्टोबर 1987) त्यांचे निधन झाले. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत जवळपास 110 संगीत दिग्दर्शकांसोबत 2678 चित्रपटांमध्ये गाणी गायली. याशिवाय किशोर दा यांनी सुमारे 88 चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून काम केले.