• الأربعاء. يناير 15th, 2025

सापाचा चावा घेणं Sunny Deol ला पडलं भारी….

Byगौरव नाटेकर

يونيو 27, 2021

त्याला बदला घेणं इतकं महाग पडलं की, त्याला थेट रुग्णालयात दाखल करावं लागलं. त्यामुळे हा विषय सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.

रायगढ : छत्तीसगडच्या रायगढ जिल्ह्यात एक विचित्र आणि अविश्वसनीय घटना उघडकीस आली आहे. एका तरुणाने चक्कं सापाचा बदला घेतला. परंतु त्याला बदला घेणं इतकं महाग पडलं की, त्याला थेट रुग्णालयात दाखल करावं लागलं. त्यामुळे हा विषय सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.

खरेतर छत्तीसगडच्या रायगढ जिल्ह्यातील धरमजयगड परिसरात रहाणारा सनी देओल या तरुणाच्या घरात स्वच्छतेचे काम चालू होते, त्यावेळी घरातील सदस्यांना एक विषारी साप दिसला. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी त्या सापांना ठार मारुन पुरले. परंतु थोड्या वेळाने जेव्हा सनी देओलला हे कळले, तेव्हा त्याने पुरलेला साप बाहेर काढला. बाहेर काढल्यानंतर सनीला कळले की, हा साप मेला नव्हता. खरेतर हा साप अर्धमेला झाला होता, त्यामुळे सापाने त्याला दंश केला.

सापाचा बदला
सापाने दंश केल्यामुळे युवकाला इतका राग आला की, त्याने सापाच्या डोक्याचा चावा घेतला आणि त्याला गिळून टाकले. त्यानंतर सनी देओलची प्रकृती बिघडू लागली, तेव्हा घरातील लोकांनी घाईघाईने त्याला स्थानिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. जिथे त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे स्थानिकांनी सांगितले. सध्या या तरुणांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, दातांनी सापाच्या डोक्याला चावा घेऊन युवकाने साप गिळला. ही घटना अत्यंत धक्कादायक आहे.