• السبت. ديسمبر 21st, 2024

IPL 2022: उमरान मलिकचं कौतुक करताना पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने भारताला डिवचलं, म्हणाला….

यंदाच्या आयपीएलच्या हंगामात उमरान मलिक या गोलंदाजाचे नाव खुप चर्चेत आहे. उमरानच्या गोलंदाजीचे अनेक दिग्गज खेळाडूंकडून कौतुक होत आहे.

मुंबई : यंदाच्या आयपीएलच्या हंगामात उमरान मलिक या गोलंदाजाचे नाव खुप चर्चेत आहे. उमरानच्या गोलंदाजीचे अनेक दिग्गज खेळाडूंकडून कौतुक होत आहे. त्यात आता पाकिस्तानच्या एका माजी क्रिकेटपटूने उमरान मलिकचे कौतुक केले आहे. उमरान मलिकने कौतुक करताना या पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने भारताला डिवचलं आहे. पाकिस्तानचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमलने एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत उमरान मलिकचे जोरदार कौतुक केले आहे. अकमल म्हणतो, जर उमरान पाकिस्तान क्रिकेटचा भाग असता तर त्याने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले असते.

तसेच पुढे अकमल म्हणाला, त्याची इकोनॉमी चांगली आहे, पण तो स्ट्राइक गोलंदाज आहे आणि त्याला विकेट मिळत आहेत. त्याचा स्पीड चार्ट प्रत्येक सामन्यानंतर येतो, जिथे त्याचा वेग 155 किमी/ताशी असतो आणि तो कमी होत नाही. पूर्वी भारतीय क्रिकेटमध्ये चांगल्या वेगवान गोलंदाजांची कमतरता होती, पण आता त्यांच्याकडे नवदीप सैनी, सिराज, शमी आणि बुमराहसारखे वेगवान गोलंदाज असल्याचेही त्यांनी म्हटले.

भारतीय क्रिकेटने मलिकला आयपीएलच्या संपूर्ण हंगामात खेळण्याची संधी देऊन बरीच परिपक्वता दाखवली.ब्रेट ली आणि शोएब अख्तरही महागडे ठरले, पण त्यांनी विकेट घेतल्या आणि अशा स्ट्राईक गोलंदाजांची गरज आहे, असेही अकमल म्हणाला. उमरान मलिकला सनरायझर्स हैदराबादने आयपीएल लिलावापूर्वी 4 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले होते. तसेच नेट बॉलर म्हणून 2021 च्या T20 वर्ल्ड कपमध्ये तो टीम इंडियाचा भाग होता. आयपीएलच्या शेवटच्या हंगामात उमरान मलिक केवळ 3 सामने खेळू शकला होता.