• الخميس. نوفمبر 21st, 2024

IPL : CSK VS GT:आयपीएल 2023 चा पहिला सामना गुजरात टायटन्सने जिंकला; चेन्नई सुपर किंग्जचा 5 गडी राखून पराभव

आयपीएल 2023 चा पहिल्या सामना आज गुजरात टायटन्सने जिंकला. या संघाने चेन्नई सुपर किंग्जचा 5 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्ससमोर विजयासाठी 179 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात गुजरातने हे आव्हान अखेरच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर पूर्ण केले.

शुभमनची बहारदार फलंदाजी

गुजराततर्फे सलामीवीर शुभमन गिलने 63 धावा केल्या तर सलामीलाच आलेल्या रिद्दीमान साहा याने स्फोटक खेळ करीत 22 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीची धुरा शुभमनने हाती घेतली त्याच्या फलंदाजीपुढे विजय दृष्टीपथात होता परंतु, तो बाद झाल्यानंतर अन्य तीन फलंदाजही ठाराविक अंतराने बाद झाले.

तेवतीयाने ठोकला विजयी चौकार

एक बाजूने तेवतीया संघासाठी झुंजत होता. 18 व्या षटकानंतर पुन्हा विजयाचे पारडे चेन्नइ संघाकडे झुकले. त्यावेळी गुजरातला 9 चेंडूत 18 धावांची गरज होती. यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या राशिद खानने स्फोटक फलंदाजी करीत संघाला विजयाच्या जवळ नेले तर राहुल तेवतिया याने चांगली फटकेबाजी करीत विजयी चौकार लगावला. तो 15 धावांवर नाबाद राहीला.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 20 षटकांत 7 गडी गमावून 178 धावा केल्या. सीएसकेकडून सलामीवीर ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक 92 धावा केल्या. मोईन अलीने 23 धावा केल्या. जीटीकडून मोहम्मद शमी, राशिद खान आणि अल्झारी जोसेफ यांनी 2-2 विकेट घेतल्या.

गिल-सुदर्शन यांच्यात अर्धशतकी भागीदारी

सलामीवीर शुभमन गिल आणि प्रभावशाली खेळाडू साई सुदर्शन यांनी 35 चेंडूत 53 धावांची भागीदारी केली. येथे सुदर्शन 22 धावा करून बाद झाला.

पॉवरप्लेमध्ये गुजरातची धमाकेदार सुरुवात

179 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शुभमन गिल आणि रिद्धिमान साहाने गुजरातला दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी 37 धावांची भागीदारी केली, साहा 25 धावा करून राजवर्धन हंगरगेकरचा बळी ठरला. गिलने साई सुदर्शनसह डावाचे नेतृत्व केले आणि पॉवरप्लेच्या 6 षटकांत संघाची धावसंख्या 65 पर्यंत नेली.

अशा पडल्या गुजरातच्या विकेट्स

पहिला : पदार्पण करणाऱ्या हंगरगेकरने चौथ्या षटकाच्या 5व्या चेंडूवर साहाला शिवम दुबेकरवी झेलबाद केले.
दुसरा: 10व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर हेंगरगेकरने साई सुदर्शनला धोनीकरवी झेलबाद केले.
तिसरा: 13व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर जडेजाने पांड्याला बोल्ड केले.
चौथा: 15व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर तुषार देशपांडेने गिलला डीप मिडविकेटवर गायकवाडकरवी झेलबाद केले.

पाचवा: 19व्या षटकात हेंगरगेकरने विजय शंकरला सँटनरकरवी झेलबाद केले.

चेन्नई-गुजरात सामन्याचे स्कोअरकार्ड

पॉवरप्लेमध्ये वेगवान सुरुवात, 2 विकेट्सही गमावल्या
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात खराब झाली. तिसर्‍याच षटकात डेव्हॉन कॉनवेला मोहम्मद शमीने बोल्ड केले. त्याच्यानंतर मोईन अलीने संघाला दमदार सुरुवात करून दिली. त्याने 17 चेंडूंत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 23 धावा केल्या. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात मोईनला रशीद खानने बाद केले. यानंतर संघाने 6 षटकांत 2 विकेट गमावून 51 धावा करून आपला पॉवरप्ले पूर्ण केला.

अशा पडल्या चेन्नईच्या विकेट्स…

पहिली: मोहम्मद शमीने तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर कॉनवेला बोल्ड केले.
दुसरी: सहाव्या षटकाच्या 5व्या चेंडूवर रशीद खानने मोईन अलीला यष्टिरक्षक साहाकडे झेलबाद केले.
तिसरी: 8व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर राशिद खान यष्टीरक्षक साहाकडे झेलबाद झाला.

चौथी: 13व्या षटकाच्या 5व्या चेंडूवर अंबाती रायुडूला लिटलने बोल्ड केले.
पाचवी: 18व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर अल्झारी जोसेफने ऋतुराज गायकवाडला शुभमन गिलकरवी झेलबाद केले.
सहावी: 18व्या षटकातील 4 चेंडूंवर रवींद्र जडेजाने विजय शंकरला अल्झारी जोसेफकरवी झेलबाद केले.

सातवा : मोहम्मद शमीने 19व्या षटकातील 3 चेंडूंवर राशिद खानचा झेल घेतला.
पाहा फोटोंमध्ये…चेन्नई-गुजरात सामन्याचा थरार …